SAIF ALI KHAN | (PICTURE CREDIT: INSTAGRAM)

सेक्रेड गेम्सचा (Sacred games) पहिला सिजन हिट झाला आणि दुसरा सीजन कधी येणार हा प्रश्न लोकांना पडला. अखेरीस 2019 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुसरा सीजन रिलीज करायचा ठरलं आणि लोकांची उत्सुकता शिगेला पोचली. पण लोकांचा अपेक्षाभंग झाला. बऱ्याच जणांना हा सीजन तितकासा आवडला नाही. कथेमधल्या 'गुरुजींच्या' पात्राविषयी फार चर्चा झाली. बऱ्याच जणांनी या कथासूत्रावर नाके मुरडली.

त्याबद्दलच बोलत असताना सैफ अली खान (Saif ali khan) म्हणाला,''पहिल्या सीजनच्या तुलनेत या सिजनला मिळालेल्या थंड प्रतिसादाने मी थोडा नाराज आहे. काहींना हे थोडं वेगळं वाटलं, पण खरे तर हे सेक्रेड गेम्स होते आणि 'गुरुजी' काय करतात, हीच कथा असणार होती. पण माझा एक स्पॉटबॉय आहे, हिरा नावाचा, ज्याच्या मताला मी फार मानतो, त्याच्या मते गुरुजींचं थोडं अति झालं.'

दुसऱ्या सीजनच्या शेवटाबाबत तो म्हणाला,''मला शेवट ठीक वाटला. सरताज तो बॉम्ब बंद करतो कि तो फुटतो ह्याने काही तसा फार फरक पडला नसता. पहिला सीजन नक्कीच वेगळा होता. खासकरून कुक्कुचं पात्र, तसेच माझ्या पात्राचा प्रवास. विक्रम मोटवानेने डायरेक्टर म्हणून खूप चांगलं काम केलं होतं. त्यामुळे लोकांना पहिला सीजन जास्त आवडला असेल तर मी समजू शकतो.''

18 ऑक्टोबरला सैफचा 'लाल कप्तान' (Laal kaptaan) हा चित्रपट रिलीज होत आहे. तर दुसरीकडे त्याने 'तानाजी: द अनसंग वॉरिअर' (Tanaji: the unsung warrior) ह्या चित्रपटासाठी तयारी सुरु केली आहे.