Saif Ali Khan (Photo Credits-Instagram)

Saif Ali Khan News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अभिनेत्याला आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. प्राथमिक माहितीनुसार डिस्चार्ज ची कागदपत्रे तयार करण्यात आली असून आज सकाळी १० नंतर त्यांना केव्हाही डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. सैफ अली खानयाच्या वांद्रे येथील राहत्या घरी गुरुवारी एका चोरट्याने त्याच्यावर सहा वार केले. रात्री अडीचच्या सुमारास त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आणि त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याच्या शरीरातून काढलेल्या तीन इंच लांबीच्या धारदार चाकूच्या तुकड्याचे छायाचित्रही रुग्णालयाने प्रसिद्ध केले होते. हल्ल्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आणि त्यांनी बांगलादेशचा नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला ठाण्यातून अटक केली. तो बांगलादेशचा आहे, पण भारतात प्रवेश केल्यानंतर त्याने चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड मिळवले आणि कामाला लागला. आतापर्यंतच्या पोलिस तपासात तो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सैफसोबत त्याचे भांडण झाले, त्यानंतर त्याने सैफवर एकापाठोपाठ एक चाकूने हल्ला केला, ज्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला.