यंदाची बहुप्रतीक्षित वेब सिरीज म्हणजे सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games 2) नुकतीच नेटफ्लिक्स (Netflix) वर प्रदर्शित झाली. पण यानंतर अवघ्या काहीच तासात ही संपूर्ण सिरीज तामिळ रॉकर्स (Tamil Rockers) या कुख्यात पायरसी (Piracy) वेबसाईटवर पायरेटेड व्हर्जन मध्ये लीक करण्यात आली. साहजिकच ही सिरीज नेटफ्लिक्स वर शुल्क देऊन बघता येते मात्र या वेबसाईटवर हे सर्व एपिसोड अगदी फुकट उपलब्ध आहेत. यामुळे सीरिजच्या निर्मात्यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.NetFlix ने भारतात लाँच केला 199 रुपयांचा 'Mobile Only' प्लान
दरम्यान काही दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स यांना तामिळ रॉकर्स सह EZTV, कॅटमूव्हीज आणि लाइमटॉरेंट यांसारख्या वेबासाइटला सेवा पुरवणे बंद करण्याचे आदेश दिले होते. पायरसीच्या मुद्द्यावरून अनेकदा या कंपन्यांचे नाव समोर येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यानंतरही तामिळ रॉकर्सवर सेक्रेड गेम्स 2 चे पायरेटेड व्हर्जन आल्याने या निर्णयाचा कितपत परिणाम झाला आहे हे नव्याने सांगायला नको.(Porn Video ऑनलाईन पाहता? सावधान! ब्लॅकमेल करण्यासाठी केलं जातंय व्हिडिओ रेकॉर्डिंग)
सेक्रेड गेम्स 2 च्या नव्या सीझनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी व सैफ अली खान सह कल्की कोचिन आणि रणवीर शौरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहे. तर यंदा अमृता सुभाष, स्मिता तांबे , अमेय वाघ या मराठमोळ्या कलालकरांचीही वर्णी लागली आहे.