काही दिवसांपूर्वीच प्रतिष्ठीत ग्लोडन ग्लोब अवॉर्ड्स (80th Golden Globe Awards) मध्ये 'Naatu Naatu' गाण्याने सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार मिळवल्यानंतर आता 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवोर्ड्समध्येही (28th Critics Choice Awards) छाप पाडली आहे. या पुरस्कार सोहळ्यात Best Foreign Language Film आणि 'Naatu Naatu' Best Song या 2 पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. अमेरिकेत हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
राजमौली यांच्या 'RRR'चित्रपटामध्ये 'Naatu Naatu' गाणामध्ये Jr NTR आणि Ram Charan झळकले आहेत. नाटू गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं. आता पुरस्कारांमध्येही त्याला पावती मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. ट्वीटर वरून Critics Choice Awards कडूनही अभिनंदन करण्यात आले आहे. तर 'RRR'च्या ट्वीटर अकाऊंटवरून या प्रोत्साहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
पहा ट्वीट्स
Congratulations to the cast and crew of @RRRMovie - winners of the #criticschoice Award for Best Foreign Language Film.#CriticsChoiceAwards pic.twitter.com/axWpzUHHDx
— Critics Choice Awards (@CriticsChoice) January 16, 2023
'Naatu Naatu' हे गाणं MM Keeravani यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. त्यांनी या अवॉर्डनंतर प्रतिक्रिया देताना हा पुरस्कार प्रोत्साहन देणारा आहे असं म्हणत गाण्याशी निगडीत अन्य सह कलाकारांचे, तंत्रज्ञांचे आभार मानले आहेत.
Naatu Naatu Again!! ??❤️?
Extremely delighted to share that we won the #CriticsChoiceAwards for the BEST SONG?? #RRRMovie
Here’s @mmkeeravaani’s acceptance speech!! pic.twitter.com/d4qcxXkMf7
— RRR Movie (@RRRMovie) January 16, 2023
RRR सिनेमा दोन तेलुगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकार आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही भूमिका होत्या.