Shiv Jayanti 2019: Riteish Deshmukh च्या खास शिवजयंती शुभेच्छा, स्वतः साकारलं छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र  (Video)
Riteish Deshmukh (Photo Credits: Twitter)

Shivaji Maharaj Jayanti 2019:  19 फेब्रुवारी हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. आज महाराष्ट्राच्या गल्लीपासून ते अगदी जगभरात शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा केला आहे. महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्‍या शिवाजी महाराज हे दैवत आहे. त्यांच्याप्रती आज आदर व्यक्त करण्यासाठी सामान्य लोकांपासून अगदी राजकारणी मंडळी आणि कलाकारांनी शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियामध्ये विविध स्वरूपात शिवजयंती साजरी केली आहे. आज शिवजयंतीचं औचित्य साधत रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) खास छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र रेखाटत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Shiv Jayanti 2019: शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी राहुल गांधी यांचं खास मराठी भाषेतून ट्विट!

शिवजयंतीच्या शुभेच्छा

अभिनेता रितेश देशमुखची चित्रकार रितेश देशमुख म्हणून आज एक झलक पाहता आली आहे. यामध्ये शिवजयंतीच्या शुभेच्छा देतानाचा एक व्हिडीओ शेअर करताना त्याने साकारलेलं चित्र व्हिडिओमध्ये पाहता येईल. त्यासोबतच त्याने शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही तर विचार आणि विश्वास आहेत, प्रत्येक मराठी मनात तो जगलाच पाहिजे असा संदेश रितेशने दिला आहे.

रितेश देशमुखचा 'टोटल धमाल' हा आगामी सिनेमा  22फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.भविष्यात रवी जाधवच्या सिनेमात रितेश शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र अद्याप या सिनेमाबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.