Rihanna Topless Photo: पॉपस्टार रिहानाने शेअर केला टॉपलेस फोटो; गळ्यात गणपतीचे लॉकेट पाहताच भारतीय नेटकरी भडकले
Rihanna (Photo Credit: Twitter)

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना (Rihanna) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि न्यूड फोटोशूटमुळे (Nude Photoshoot) नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, शेतकरी आंदोलनावर भाष्य करत ट्विट करणाऱ्या रिहानाबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे. यातच रिहाना पुन्हा एकदा न्यूड फोटोमुळे भारतीय नेटकऱ्यांची शिकार बनली आहे. नुकतेच एक टॉपलेस फोटोशूट केले आहेत. मात्र, या फोटोमध्ये तिने गळ्यात गणपतीचे लॉकेट (Ganesh Pendant) घातलेले दिसत आहे. ज्यामुळे ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. रिहानाच्या या फोटोवर संतापजनक प्रतिक्रिया येऊन लागल्या आहेत.

रिहानाने अलिकडेच आपल्या एक्स फेन्टी या वेबसाईटसाठी एक न्युज फोटोशूट केले आहे. त्यानंतर तिने ट्विटरच्या माध्यमातून यापैकी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने चक्क श्री गणेशाचे लॉकेट घातले आहे. हे फोटो पाहिताच भारतीय नेटकरी संतापले आहेत. “तू आमच्या देवतेचा अपमान करत आहेस.” असे ट्विट करत भारतीय नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. हे देखील वाचा- ‘धनंजय माने इथेच राहतात’; लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी मराठी रंगभूमी वर पदार्पण करण्यासाठी सज्ज!

रिहानाचे ट्वीट-

रिहानाने काही दिवसांपूर्वी भारतातल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा का होत नाही, असे म्हटले होते. दरम्यान, भारतातील अनेक सेलिब्रिटींनी रिहानाविरोधात एकत्र येऊन खडेबोल सुनावले होते. तसेच देशाबाहेरील व्यक्तीना भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत अनेकजण तिच्यावर भडकले होते.