Rihanna (Photo Credits: Facebook/ Rihanna)

आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या दिलावर राज्य करणारी, प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार रिहाना (Rihanna) ही जगातील सर्वात श्रीमंत महिला गायिका, संगीतकार (World's Richest Female Musician) बनली आहे. फोर्ब्सच्या (Forbes) अहवालानुसार, रिहानाने सहाशे मिलियन डॉलर्स कमावून इतर तमाम महिला गायिकांना मागे टाकत हा किताब प्राप्त केला आहे. फोर्ब्सच्या या रिपोर्टमध्ये 600 मिलियन डॉलर्स कमावून रिहाना प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर मॅडोना (Madonna) दुसऱ्या स्थानावर आहे, जिची एकूण कमाई 570 दशलक्ष डॉलर इतकी आहे. तिसरा नंबर बियॉन्सेचा (Beyonce) लागतो, जिच्याकडे 400 मिलियन डॉलरची संपती आहे.

31 वर्षीय रिहानाचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 साली झाली. बार्बेडीयन (Barbados) गायिका रिहाना ही फक्त गायिकाच नाही तर फॅशन डिझायनर, मेकअप उद्योजक, अभिनेत्री आणि एका संस्थेची संस्थापकही आहे. एका लक्झरी फॅशन हाऊसचे नेतृत्व करणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला आहे. चाहत्यांमध्ये जरी ती रिहाना या नावाने प्रसिद्ध असली, तरी अनेक व्यवसायांसाठी ती फॅंटी (Fenty) या नावाचा वापर करते. फॅंटी ब्युटीपासून एलव्हीएमएच (फ्रेंच फॅशन ग्रुप) पर्यंत रिहानाच्या सर्व फॅशन ब्रॅण्ड्सचे नाव फॅंटी हेच आहे. (हेही वाचा: मृत्युनंतरही अब्जावधींची कमाई करत आहेत ही मंडळी; मायकल जॅक्सन पहिल्या स्थानावर)

रिहानाने आपली फॅशन कंपनी 'सेव्हेज एक्स फॅंटी' 2017 मध्ये लॉन्च केली. फोर्ब्सच्या अहवालानुसार, लॉन्चच्या पहिल्या आठवड्यात कंपनीने 100 दशलक्ष डॉलर्स कमावले होते, तर गेल्या वर्षी कंपनीने 570 दशलक्ष डॉलर्स कमावले होते. कंपनीच्या यशस्वी घोडदौडीनंतर फॅंटी फॅशन व्हेंचरने फ्रेंच फॅशन ब्रँड एलव्हीएमएचशी भागीदारी केली होती. रीहांची सर्वात जास्त कमाई याच फॅशन ब्रँड मधून होत आहे.