Deenanath Mangeshkar Award 2019 (Photo Credits: Twitter)

77th Master Deenanath Mangeshkar Award: मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कलावंतांचा गौरव केला जातो. यंदा देखील 24 फेब्रुवारी दिवशी मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये 77 वा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूड मधील प्रख्यात पटकथाकार सलीम खान (Salim Khan), अभिनेत्री आणि नृत्यांगणा हेलन (Helan), ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्यासह काही कलाकारांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. RSS प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लता मंगेशकर भारतीय सैनेला करणार कोटींचे दान

ANI ट्विट 

दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2019 चे मानार्थी

सलीम खान यांना मास्टर दीनानाथ जीवनगौरव पुरस्कार, कला क्षेत्रासाठीचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना, लयोगी आश्रमच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कार्यासाठी पं. सुरेश तळवलकर यांना आनंदमयी पुरस्कार,भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी मधुर भंडारकर यांना विशेष पुरस्कार, हेलन यांना चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, भद्रकाली प्रॉडक्शनच्या 'सोयरे सकळ' या नाटकाला मोहन वाघ सर्वोत्तम नाटक पुरस्कार, वसंत आबाजी डहाके यांना वागविलासिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

यंदा लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 1 कोटी 18 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला. पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित सांगितिक कार्यक्रमामध्येही देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली.