सैराट मधून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या आकाश ठोसरला आता रणवीर सिंह काही कानमंत्र देत आहे. आश्चर्य वाटलं ना? त्याचं झालाय असं की नुकतीच आकाशने रणवीरसोबत एक जाहिरात केली आहे. 'सेट वेट' या जेलच्या जाहिरातीमध्ये दोघंही एकत्र पाहायला मिळणार आहेत.
सैराट मुळे तीन व्यक्तींच्या आयुष्याचा कायापालट झाला. नागराज मंजुळे हे नाव महाराष्ट्राला काही नवीन नव्हतं. पण अख्ख्या देशाला आपल्या नावाची दखल घ्यायला नागराजने भाग पाडलं. तसंच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू अक्षरशः एका रात्रीत सुपरस्टार होऊन गेले. तरुण वर्ग तर या दोघांची एक झलक पाहण्यासाठी सुद्धा जीव ओवाळू लागला. दोघांच्याही अभिनयाचं देखील खूप कौतुक झालं. (हेही वाचा. रणवीर-दीपिका सह हे बॉलिवूड कलाकार लाखो रुपये खर्च करुन 'Pod Supply' वरुन ऑर्डर करतात जेवण, जाणून घ्या काय आहे ही सेवा?)
View this post on Instagram
Sada Sexy Raho Man😎 @ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet
सैराट नंतर आकाशने 'एफयु' या महेश मांजरेकरांच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. तसेच नेटफ्लिक्सच्या 'लस्ट स्टोरीज' मध्येही त्याने काम केलं. आकाश आता पुढे काय करणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला असतानाच त्याने हा जाहिरातीचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओमधून आपल्याला आकाशचा मेकओव्हर पाहायला मिळतो आहे. गेले काही दिवस तो आपल्या व्यायाम करतानाचे वगैरे बरेच फोटो इंस्टावरती शेयर करत होता. त्याने घेतलेली ही मेहनत या व्हिडिओमधून नक्कीच कळत आहे.