रुपेरी पडद्यावर तग राहून राहण्यासाठी तमाम बॉलिवूडकरांना आपल्या फिटनेस बाबतीत नेहमी सतर्क राहावे लागते. त्यात त्यांच्या शुटींगच्या वेळा, त्यांचे ठिकाणे यांच्यामुळे अनेकदा त्यांचे खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होते. अशा वेळी कधी कधी त्यांना त्यांचा डाएट नीट फॉलो करता येत नाही. असे असूनही बॉलिवूडमधील बरेच कलाकार फिटनेसच्या बाबतीत नेहमी आग्रही असतात. अशा वेळी सर्वसामान्यांना असा प्रश्न पडलेला असतो की एवढं बिझी शेड्यूल असूनही हे कलाकार इतके फिट कसे काय राहू शकतात. त्यामागचे खरे कारण काही वेगळच आहे. न्यूज 18 लोकमत ने दिलेल्या बातमीनुसार, यामागचा खरा सूत्रधार आहे तो 'Pod Supply'. रणवीर सिंह (Ranveer Singh), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अक्षय कुमार (Akshay Kumar), अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याच सर्व्हीसकडून जेवण मागवतात.
सर्वांना प्रश्न पडला असेल की Pod Supply नेमकी आहे तरी काय? बॉलिवूड सेलिब्रिटीच्या डाएट प्लान विषयी अनेकांना कुतूहल असतं. तर त्यासाठी अशी एक सेवा आहे जे या सेलिब्रिटींना फुड सप्लाय करतात. Pod Supply असं या सर्व्हीसचं नाव आहे. ही एक मील सर्व्हीस आहे. जे या सेलिब्रिटींच्या हेल्दी फुडसाठी लाखो रुपये चार्ज घेतात.
‘83’ च्या शूटिंग शेड्यूल दरम्यान रणवीर सिंह याचं सर्व्हिसमधून जेवण ऑर्डर खातो. तर अभिनेता आदित्य रॉयनं सुद्धा मलंगच्या शेड्यूलवेळी इथूनच टीफिन सर्व्हिस घेतो. खिलाडी अक्षय कुमार आणि अनिल कपूर हे सुद्धा शूटिंग दरम्यान या ठिकाणचेच जेवण घेणं पसंत करतात.
हेदेखील वाचा- अभिनेत्री प्रियंका चोपड़ा ला जेवणात आवडतो हा 'मराठमोळा' पदार्थ; ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
नेमकी काय आहे ही Pod Supply सेवा?
या सेवेद्वारे फुड सप्लाय करण्यात येते. ही एक मील सर्विस आहे. या सेवेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही सेवा तुमच्या डाएटनुसार तुम्हाला जेवण देते.थोडक्यात तुमच्या हेल्थी डाएटची पुरेपूर काळजी घेते. ही सेवा सेलिब्रिटींच्या डाएटनुसार त्यांना जेवण पुरवत असल्याने त्यासाठी कलाकारांना लाखो रुपये मोजावे लागतात.
बॉलिवूडकरांमध्ये प्रसिद्ध असलेली ही सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी देखील लाइट सर्विस सुरु करण्याच्या तयारीत आहे. ज्यामुळे सामान्य लोकही त्यांच्या आवडत्या सेलेब्सप्रमाणे हेल्दी डाएट घेऊ शकणार आहेत. जे लोक त्यांच्या डाएटबाबत खूप जागरूक आहेत मात्र त्याच्याकडे वेळ नाही अशा लोकांसाठी हे फायद्याचं ठरणार आहे.