![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/Untitled-design-5-380x214.jpg)
कधी कधी बॉलीवूडची आयटम गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) हिची काय म्हणून ओळख करून द्यावी असा प्रश्न निर्माण होतो. प्रसिद्धीसाठी हपापलेली राखी चर्चेचा विषय बनण्यासाठी कोणत्याही थराला जाते. बर चित्रपटामध्ये काम तरी बरे केले असते तर एक ठीक होते. मात्र चित्रपटातदेखील स्वतःला एक्स्पोज करण्याची एकाही संधी ती सोडत नाही. तनुश्री दत्ता प्रकरणात तर तिने कहरच केला होता. आता परत एकदा मिडियामध्ये राखी विनोदाचा विषय बनली आहे. सर्व प्रकारच्या समस्यांसाठी मुख्यत्वे इनकम टॅक्स आणि घटस्फोट, तुम्ही चक्क शेणाचा फेस पॅक वापरा असे राखी लोकांना आवाहन करत आहे. या गोष्टीचा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. (हेही वाचा : महिला पैलवानने राखी सावंतला जमिनीवर आदळले; जखमी राखी हॉस्पीटलमध्ये भरती)
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये राखी चेहऱ्यावर एक फेसपॅक लावून बलेली दिसते. हा फेसपॅक चक्क गायीच्या शेणापासून बनवलेला आहे. डॉ.उमेश यांनी हा फेसपॅक राखीला सजेस्ट केला आहे. हा फेसपॅक नक्की कोणाच्या शेणाचा आहे असे राखी त्या डॉक्टरांना विचारत असलेली दिसते. डॉक्टरही मोठ्या उत्साहात हा फेसपॅक गायीच्या शेणाचा आहे असे सांगतात. याउपर कहर म्हणजे तुम्हाला कोणत्याही समस्या असतील इनकम टॅक्स किंवा घटस्फोट तर हा फेसपॅक नक्की वापरा त्याने सर्व समस्द्या दूर होतील असा सल्ला राखीने दिला आहे.
दरम्यान झी टीव्ही (Zee TV) वरील मनमोहिनी या मालिकेद्वारे राखी पुन्हा छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. या मालिकेत राखी एका महाराष्ट्रीअन चेटकीणीची भूमिका सकारत आहे.