बॉलिवूड मधील ड्राम क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. तसेच राखी सावंत हिचे लग्न झाल्याचे ही बोलले जात आहे. परंतु राखी हिने तिच्या नवऱ्याचा फोटो अद्याप कुठेही पोस्ट केला नसून त्याचे नाव रितेश असल्याचे फक्त सांगितले. ही गोष्ट नेटकऱ्यांना अद्याप पटली नसून राखी हिचे लग्नच झाले नसल्याचे बोलले जात आहे. मात्र आता राखी सावंत हिच्या नवऱ्याचा फोटो अखेर पाहायला मिळाला आहे. यामुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आले आहे.
राखी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोत तिने घातलेल्या सनग्लासेस मधील फोटो जर तुम्ही झूम करुन पाहिलात तर त्यामध्ये एक व्यक्ती दिसून येत आहे. मात्र राखीच्या नवऱ्याचा चेहरा यामध्ये स्पष्टपणे दिसून येत नाह आहे. परंतु हा फोटो पाहिल्यावर राखी खरचं हनीमुनसाठी गेली असल्याचे आता बोलले जात आहे. राखीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोखाली माझे नवऱ्यावर खुप प्रेम असल्याची भावनासुद्धा व्यक्त केली आहे.(हॉट गर्ल राखी सावंत हिने स्वत:च्या हनिमूनसाठी हॉटेलमध्येच बनविला हा स्पेशल स्विमिंग पूल, Watch Video)
एका मुलाखतीवेळी राखी हिने तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता. मात्र लग्नावेळी फक्त जवळीच मंडळी उपस्थित होती. परंतु राखी हिचा नवरा हा भारतात राहत नसून तो लंडन मध्ये असल्याचे बोलले जात आहे. पण राखी हिचे लग्न झाले असले तरीही ती भारतामध्येच राहत आहे.