Rakhi Sawant Birthday : 50 रुपयांसाठी राखी लग्नात बनली होती वेट्रेस; एका किसिंग सीनसाठी घेतले होते 55 रिटेक्स
राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

राखी आणि वाद यांचे नाते फार जुने आहे. आपली वक्त्यव्ये, करामती, अभिनय यांमुळे सतत चर्चेत राहणारी राखी आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करीत आहे. मिका सिंगच्या कीस पासून ते बिग बॉस, विविध आयटम नंबर्स, तनुश्री दत्ता प्रकरण आणि आता एका परदेशी महिला कुस्तीपटूकडून खाल्लेला मार, अशा अनेक गोष्टींनी राखीची कारकीर्द गाजली आहे. सोशल मिडीयावर राखी खूपच सक्रीय असून, या माध्यमातून तिने अनेकांवर टीकास्त्र सोडले आहे. कुणी याला पब्लिसिटी स्टंट म्हणत तर कुणी वेडे चाळे. मात्र या जागी पोहचण्यासाठी राखीला खचितच बराच स्ट्रगल करावा लागला आहे, एकेकाळी 50 रुपयांसाठी वेट्रेस बनलेल्या राखीने चक्क अनिल अंबानींच्या लग्नात लोकांना जेवण वाढण्याचे काम केले होते.

राखी सावंतचे वडिल आनंद सावंत हे मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत आई जयासोबत आली होती. राखीला सुरुवातीच्या काळात फार कठिण प्रसंगातून जावे लागले आहे. एक काळ होता जेव्हा राखीच्या कुटुंबीयांनी 10 वर्षाच्या राखीला टीना मुनीम आणि अनिल अंबानी यांच्या लग्नात जेवण वाढण्याचे काम करण्यास भाग पडले होते. त्यावेळी राखीला दिवसाला 50 रुपये मिळत असत. राखी अशा कुटुंबातून आली आहे जिथे महिलांना कोणत्याच प्रकारचे स्वातंत्र्य नसते. त्यांच्या घरातील स्त्रिया पुरुषांसमोर येण्याचीही हिम्मत करत नाहीत. अशात राखीने बोल्ड क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिला घरुन विरोधही झाला होता. मात्र, या विरोधाला न झुगारता तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.

राखीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, तिला तिच्या बालपणात कधीच परत जायचे नाही. राखीला लहानपणापासून नृत्याची आवड होती मात्र, तिच्या आईने ती डान्स करते म्हणून तिचे केस कापले होते. राखीचा मामाही तिला फार मारायचा. म्हणूनच अशा प्रकारचे बालपण कोणाच्याही नशिबी येऊ नये असे राखी म्हणते. मिका सिंगच्या प्रसंगानंतर राखी पूर्णपणे हादरून गेली होती, याचाच परिणाम तिच्या एका चित्रपटावर झाला होता. राखी जेव्हा पहिल्यांना किसिंग सीन करत होती त्यावेळी तिला तब्बल 55 रिटेक्स घ्यावे लागले होते याच सोबत अर्धी बाटली दारूदेखील प्यायला लागली होती.

'अग्निचक्र' या सिनेमातून राखीने आपल्या करिअरची सुरूवात केली. तसेच राखीने हिट असे आयटम साँग बॉलिवूडला दिले आहेत. सध्या तिचे कोणतेही चित्रपट नसतील तरी, शोजमधून तिची मिळकत होत राहते. राखीचे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. ज्याची किंमत 11 करोड रुपये आहे. राखीजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार देखील आहे. राखीची सर्वाधिक कमाई ही स्टेज परफॉर्मेसमधूनच होते.