प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांना 25 डिसेंबर, क्रिसमस दिवशी हैदराबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते रूग्णलयातच असून त्यांना उच्च रक्तादाबाचा त्रास (fluctuations in blood pressure) जाणवत आहे. रक्तदाबासोबतच थकवा असल्याने त्यांना अद्याप हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आलेली नाही. दरम्यान रजनीकांत Annaatthe सिनेमाचं शूटिंग करत होते. त्यावेळेस सेटवर एकजण कोविड 19 बाधित असल्याचं समोर आलं. मात्र त्यानंतर रजनीकांत यांची करण्यात आलेली कोविड टेस्ट निगेटीव्ह आल्याने त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. Rajinikanth Admitted to Hospital: सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती खालावली; उपचारासाठी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल.
रजनीकांत यांच्या आरोग्याबाबत अपोलो हॉस्पिटलकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये रजनीकांत यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या आरोग्यचाचण्यांमध्ये कोणतीही मोठी गंभीर गोष्ट समोर आलेली नसल्याचं सांगण्यात आले आहे. रजनीकांत यांना भेटण्यासाठी कुणालाच प्रवेश दिला जात नाही मात्र त्यांची मुलगी त्यांच्यासोबत असल्याचं त्यामध्ये सांगण्यात आले आहे. रजनीकांत यांच्या काही चाचण्यांचे अहवाल आज संध्यापर्यंत येणार आहेत. ते पाहून त्यांच्या हॉस्पिटलमधील डिस्चार्जबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान सध्या त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
Superstar #Rajinikanth who was Friday admitted to a hospital here with severe fluctuations in blood pressure, is progressing well, doctors said on Saturday. pic.twitter.com/2CBPI16qHH
— IANS Tweets (@ians_india) December 26, 2020
दरम्यान 2020 च्या 31 डिसेंबरला रजनीकांत त्यांच्या राजकीय पक्षाबद्दल माहिती देणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी यबद्दल घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांकडे या नव्या पक्षाच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे. रजनीकांत यांचे राजकीय सल्लागार Tamilaruvi Manian यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये रजनीकांत यांचा राजकीय पक्ष सार्या 234 जागा लढणार आहे.