Rajinikanth (Photo Credit: PTI)

दाक्षिणात्य अभिनेते आणि सुपरस्टार सजनीकांत (Rajinikanth) यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रजनीकांत यांच्यावर हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रूग्णालयाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती देण्यात आली आहे. त्यांना अन्य कोणतेही लक्षणे नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रजनीकांत हे गेल्या दहा दिवसांपासून अन्नाथे या चित्रपटाच्या शूटींगसाठी हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळत आहे. रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयात बारीक देखरेखही ठेवण्यात येणार आहे.

रजनीकांत यांच्या 'अन्नाथे' या आगामी चित्रपटाचे शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये आहेत. दरम्यान, त्यांच्या टीममधील चार सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यामुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आली होती. त्यानंतर रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या फार्महाऊसमध्ये आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. हे देखील वाचा- Ranbir Kapoor and Alia Bhatt Marriage: आलिया भट्टसोबतच्या लग्नाबाबत रणबीर कपूरचा खुलासा, '...तर यावर्षी आमचे लग्न झाले असते.'

एएनआयचे ट्वीट-

रजनीकांत यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत. परंतु, रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे. त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान, रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे. तसेच रुग्णालयात बारीक देखरेखही ठेवण्यात येणार आहे, अपोलो रुग्णालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.