Raj Kundra Porn Film Case: मनीषा केळकर कडेही राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून फोटो, व्हिडिओ ची विचारणा; मराठी अभिनेत्रीचा खुलासा
Manisha Kelkar | PC: Instagram

पॉर्न फिल्म रॅकेट मध्ये सध्या रोज नवनवे खुलासे होत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा याप्रकरणामध्ये अटकेत असल्याने या सार्‍या प्रकरणाला ग्लॅमर मिळालं आहे. बॉलिवूड मध्येही अनेक अभिनेत्री या प्रकरणात समोर आल्या आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मनिषा केळकर (Manisha Kelkar) कडून देखील तिला राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस (Raj Kundra Production House) कडून काही फोटो आणि व्हिडिओ ची विचारणा झाली होती अशी माहिती समोर आली आहे. मनिषाने स्वतः एबीपी माझा सोबत मुलाखत देताना हा गौप्यस्फोट केला आहे. सुदैवाने अशाप्रकारे फोटो, व्हिडिओची मागणी का होत आहे याचं समाधानकारक प्रोडक्शन हाऊसकडून न मिळाल्याने तिने ऑफर स्वीकारली नसल्याचं म्हटलं आहे. Raj Kundra Pornography Case: अभिनेत्री Gehana Vasisth ला Mumbai Sessions Court कडून Interim Relief नाहीच; 6 ऑगस्टला पुढील सुनावणी.

मनिषा केळकर ने 'ह्यांचा काही नेम नाही’, ‘चंद्रकोर’,’भोळा शंकर’ या मराठी तर ‘बंदूक’, ‘लॉटरी’या हिंदी सिनेमात काम केले आहे. काही महिन्यांपूर्वी मनिषाकडे राज कुंद्रा प्रोडक्शन हाऊस कडून ऑफर आली होती. 'राज कुंद्रा' या नावाने ती देखील भारावली होती. पुढे तिच्याकडे काही फोटो, व्हिडिओ ची मागणी झाली होती. या फोटोशूटची आणि व्हिडीओची काही कथा किंवा थीम आहे का? असा प्रश्न मनिषाने विचारला होता. त्यावर तिला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. फक्त एखाद्या वेब साईटवर आपले फोटो आणि व्हिडीओ टाकले जाणार या कल्पनेने मनिषाने ती ऑफर स्वीकरली नव्हती. आता राज कुंद्रा पॉर्न फिल्म रॅकेट समोर आल्यानंतर तिला आपला निर्णय योग्य असल्याचं पुन्हा पटलं आहे.

दरम्यान मनिषाने मुलींना कोणत्याही कास्टिंगच्या वेळेस आपला सिक्स सेन्स जागृत ठेवा. थोडी पुढची मागची माहिती पहा, टेक्नॉलॉजिकली जागृक रहा असा सल्ला देखील तिने या क्षेत्रातील मुलींना दिला आहे.

राज कुंद्रा लंडन मध्ये हॉटशॉट अ‍ॅप साठी काही पॉर्न फिल्म्स बनवून देत होता असा मुंबई पोलिसांचा दावा आहे. याप्रकरणी 19 जुलै पासून राज पोलिस कोठडीमध्ये आहे. तर पोलिसांकडून या प्रकरणी तपास आणि न्यायालयीन लढाई सुरू आहे. काही अभिनेत्री, मॉडेलच्या तक्रारीनंतरच हे प्रकरण समोर आलं आहे.