Prarthana Behare | Photo Credits: Instagram/ Prarthana Behare

भारत देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमधून सावरत असताना आता तिसर्‍या लाटेपासूनही सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान समाजातील प्रत्येक घटकाला, स्तराला कोरोनाचा फटका असला असताना समाजमाध्यमातून एकमेकांसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. अशामध्ये कलाकार मंडळी देखील मागे नाहीत. मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) सध्या अभिनय थोडा बाजूला ठेवत तिच्यामधील चित्रकार जोपासत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रार्थनाने काही चित्र रेखाटली आहेत. आणि आता हीच चित्रं ती विकून गरजवंतांसाठी मदत गोळा आहेत. चित्र विकून मिळणारे पैसे प्रार्थना कोरोना संकटात आर्थिक घडी विस्कटलेल्या लोकांसाठी वापरणार आहे. आजच प्रार्थनाने एक इंस्टाग्राम पोस्ट लिहित तिने आपल्या या नव्या उपक्रमाची माहिती दिली आहे. (नक्की वाचा: Salman Khan ने उपलब्ध केले मुंबईत 500 Oxygen Concentrators; गरजवंत इथे मागू शकतात मदत).

प्रार्थना बेहरे ने लिहलेल्या पोस्ट मध्ये तिने 'कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागतय ,आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागताय. अश्यावेळी मी त्यांच्या साठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा ? लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मैत्रिणीने पेंटिंग्सच्या माध्यमातून आर्थिक निधी उभारण्याचा मार्ग सुचवला. हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहेत अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्या कडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा. जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरनी ते घरपोच पाठवले जातील आणि स्वतः प्रार्थना त्यांच्यासोबत संपर्क साधणार असल्याचंही तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे.

प्रार्थना बेहरेची पेंटिंग्स

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

दरम्यान सध्या अनेक कलाकार आपलं सामाजिक भान जपताना दिसत आहे. अनेकांनी विविध माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक रवी जाधव केईएम हॉस्पिटल जवळ रूग्णांच्या नातेवाईकांना अन्न वाटप करताना दिसला. तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने आपलं लग्न प्री पोन करत लग्नाच्या खर्चाला कात्री लावत तो कोरोना संकटात मदत म्हणून देण्याचा विचार मांडला आहे.

प्रार्थना बेहरेची सुरूवात हिंदी मालिका पवित्र रिश्ता मधून झाली. नंतर ती अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये झळकली. वैभव तत्त्ववादी सोबत तिची ऑन स्क्रिन जोडी विशेष गाजली.