Dabangg 3: सलमान खान च्या दबंग 3 चे शुटींग सुरु; प्रमोद खन्ना साकारणार आपल्या भावाची, विनोद खन्ना यांची भूमिका
दबंग 3 (Photo Credit : Twitter)

बॉलीवुडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) भारत चित्रपटाच्या यशानंतर दबंग फ्रँचायजीचा तिसरा भाग दबंग 3 (Dabangg 3) चे शुटींग सुरु केले आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात सलमान खान चुलबुल पांडे ही भूमिका साकारत आहे. तर सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) चुलबुल पांडे याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. पण चित्रपटामधील सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारणारे विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर चित्रपटामध्ये त्यांचे स्थान कोण घेईल हा एक मोठा प्रश्न होता, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले, मात्र आता विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना (Pramod Khanna) ही भूमिका साकारत असल्याची माहिती मिळत आहे.

सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रॅम व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. या भूमिकेसाठी अमेक लोकांचा विचार करण्यात आला होता, अखेर प्रमोद खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सलमानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विनोद खन्ना यांचे भाऊ प्रमोद खन्ना, सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि प्रभू देवा दिसून येत आहेत. दाबंद 3 मध्ये प्रजापती पांडे ही भूमिका प्रमोदजी सकारात असल्याची माहिती या व्हिडिओद्वारे मिळत आहे. (हेही वाचा: 'दबंग 3' मधील सोनाक्षी सिन्हा हिचा लूक आऊट; पहा रज्जोची खास झलक (Photo))

दरम्यान, गेले दोन महिने दबंग 3 चे शुटींग सुरु आहे. सलमान खान आणि अरबाझ खान हे या चित्रपटाचे निर्माते असून, प्रभू देवा हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. हा चित्रपट 2019 मधील महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यावर्षी ख्रिसमसच्या दरम्यान 20 डिसेंबररोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त सलमान खान लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’चे शूटिंगही सुरू करणार आहे. यामध्ये आलिया मुख्य भूमिकेत आहे.