Khoti Marathi Movie: शंशिकात तुपे दिग्दर्शित 'खोटी' चित्रपटाचं पोस्टर रिलीज!
Khoti Marathi Movie

महाराष्ट्र अनलॉक होत असताना आता मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. चित्रपटगृहात आता शंभर टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी मिळाली असल्याने अनेक मराठी चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ओजस्वी मल्टीमीडियाच्या आगामी 'खोटी' या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत संपन्न झाला. यावेळी चित्रपटाचा पोस्टरही रिलीज करण्यात आला. शशिकांत तुपे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. मुहूर्ताच्यावेळी दिग्दर्शक शशिकांत तुपे यांच्यासह सिनेमाची तगडी स्टारकास्टही उपस्थित होती. यावेळी अभिनेते विजय पाटकर, विजय कदम, सुहृद वार्डेकर, जयवंत वाडकर, स्मिता रेठरेकर, अस्मिता पांडे आणि संगीतकार मिलींद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री विनायक मुंडे उपस्थित होते. सिनेमाच्या कथानकाबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र 'खोटी' या चित्रपटाचा पोस्टर फारच बोलका आहे. हा सिनेमा खेळाडू मुलगी आणि तिच्या कोचवर आधारित असल्याची कल्पना येते. चित्रपटाला मिलिंद मोरे यांचं संगीत लाभलंय. (हे देखील वाचा: राष्ट्रीय पुरस्कारविजेते शिवाजी लोटण-पाटील यांच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री)

'खोटी' या चित्रपटाचे छायाचित्रण सुनिल वानखेडे यांनी केलंय. तर रंगराव घागरे हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. सिनेमा खेळाभोवती आधारित असला तरीही कथानकाची कल्पना येण्यासाठी तुम्हांला ट्रेलरची वाट पाहावी लागेल. सिनेमाचे शूटिंग येत्या काही दिवसांत सुरु होईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.