Kolkata: बंगाली सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रूपा दत्ता पाकीटमारीच्या आरोपाखाली अटक, 75 हजार रुपये सापडल्याची माहिती
Rupa Dutta (Photo Credit - Insta)

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बंगाली अभिनेत्री रुपा दत्ता (Rupa Dutta) पाकीटमारीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणात आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वतः अभिनेत्रीने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत. अभिनेत्री नुकतीच एका पुस्तक मेळावाच्या दरम्यान गेली होती, तिथे पाकीटमारी केल्याचे उघडकीस झाले, पोलिसांनीही विलंब न लावता तिला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावादरम्यान तैनात असलेल्या पोलिसांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये बॅग फेकताना पाहिले. पोलिसांनी संशयावरून महिलेची चौकशी केली असता ती नीट उत्तर देत नव्हती. महिलेला विधाननगर उत्तर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे चौकशी केली असता ती बंगाली अभिनेत्री रूपा दत्ता असल्याचे समजले. सूत्रानुसार, रूपा दत्ता हिची झडती घेतली असता पोलिसांना तिच्याकडून 75,000 रुपये मिळाले आहे.

रुपा दत्ता यांनी बंगालीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. चौकशीत त्याने पाकीटमारल्याची कबुली दिली आहे. रूपा दत्ता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी रूपा दत्ता यांना न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रूपाने दत्ताने अश्या घटना अनेकदा केल्या आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने कबूल केले आहे की तिने यापूर्वी अनेकदा अशा घटना केल्या आहेत. चोरीच्या उद्देशाने अनेकवेळा गजबजलेल्या भागात जाऊन पाकीचमारल्याचे तिने पोलिसांना सांगितले. कोलकाता पुस्तक मेळाव्यात येण्यामागे तिता तोच हेतू होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे असे मानले जात आहे की कदाचित रूपा देखील क्लेप्टोमॅनियाची रुग्ण आहे. (हे ही वाचा Namrata Malla Bold Photos:भोजपुरी सिनेमातील बोल्ड अभिनेत्री नम्रता मल्लाचा Bikini look व्हायरल, पाहा फोटो)

अनुराग कश्यपवर केले होते गंभाप आरोप

पोलिसांनी सांगितले की, ही रुपा दत्ता चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. काही वर्षांपूर्वी रुपा दत्ताने हिंदी चित्रपट निर्माता अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही आणि कोठेही तक्रार केली नाही. त्यावेळीही त्यांनी चर्चेत येण्यासाठी खोटे आरोप केल्याचे सांगण्यात आले. रुपा दत्ताच्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, तिने टीव्ही सीरियल 'जय माँ वैष्णो देवी' मध्ये माता वैष्णो देवीची भूमिका साकारली आहे. ती स्वत:चे लेखिका, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही वर्णन करते.