Poonam Pandey & Sam Bombay (PC - Instagram)

अश्लील व्हिडिओ शूट प्रकरणी (Obscene Video Case) अटक करण्यात आलेल्या मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) आणि तिच्या नवऱ्याची जामिनावर सुटका झाली आहे. काल (गुरुवार, 5 नोव्हेंबर) गोवा पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा डिरेक्टर नवरा, सॅम बॉम्बे (Sam Bombay) यांना अटक केली होती. गोव्यातील कॅनकोना (Canacona) येथील चपोली धरणाजवळ (Chapoli Dam) पूनम पांडे हिने आक्षेपार्ह फोटोशूट केले होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काल रात्री सुमारे 9.15 वाजताच्या सुमारास या दाम्पत्याला न्यायिक दंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी), कॅनाकोना यांनी जामीन मंजूर केला. (Model Poonam Pandey Arrested: पूनम पांडे हिस गोवा पालिसांकडून अटक, कथीत अश्लिल व्हिडिओ चित्रिकरण भोवले)

दरम्यान, जामीनावर सुटका झाली असली तरी ते दोघेही गोव्याबाहेर जावू शकत नाहीत आणि पुढील 6 दिवसांसाठी त्यांना रोज पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी जावे लागणार आहे, असे पोलिस अधिकारी थेरॉन डी’कोस्टा यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

Hey Husband, happy Karwa Chauth ❤️

A post shared by Poonam Pandey Bombay (@ipoonampandey) on

पूनम पांडे हिच्या अश्लील व्हिडिओ संदर्भात गोवा पोलिसांत सुमारे अर्धा डझन लेखी तक्रारी दाखल झाल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केली. तसंच पूनमला फोटोशूटची परवानगी देणाऱ्या कॅनाकोना पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. (Poonam Pandey Hot Video: बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिची 'अशी 'सेक्सी अदा पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया, Watch Video)

सेक्सी, हॉट, बोल्ड फोटोज, व्हिडिओज यासाठी प्रसिद्ध असलेली पूनम पांडे अनेकदा विविध वादांमुळेही चर्चेत असते. यापूर्वी लग्नानंतर 3 दिवसांतच पतीविरुद्ध विनयभंगाची तक्रार केल्याने पूनम चर्चेत आली होती. मात्र त्यानंतर पूनमचे तक्रार मागे घेतली होती.