पूजा सावंत आणि भुषण प्रधान यांचे रोमँटिक फोटो पाहून सोशल मीडियावर रंगतेय चर्चा; तुम्ही पाहिलेत का?
Pooja Sawant & Bhushan Pradhan (Photo Credits: Instagram)

फेब्रुवारी सुरु होताच सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागतात, प्रेमी युगुलांच्या आवडीचा व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुद्धा आता सुरु झाला आहे, त्यामुळे हळूहळू आता अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली द्यायला सुरुवात केलीय, अर्थात सेलिब्रिटी मंडळी सुद्धा यात मागे नाहीत, अलीकडेच मराठी अभनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिने सुद्धा आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करून आपण प्रेमात असल्याचे सांगितले होते, अप्सरा सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने सुद्धा आपल्या स्पेशल व्यक्तीसोबत ऍडव्हेंचर करतानाचा एक व्हिडीओ आपल्या फॅन्स सोबत शेअर केला होता. आता त्यापाठोपाठ काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिचे सुद्धा अफेअर सुरु असल्याच्या चर्चा आहेत, अभिनेता भूषण प्रधान आणि पूजा हे मागील काही दिवसांपासून आपले भलतेच रोमँटिक अंदाजातील फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करत आहेत, त्यामुळे हे दोघे डेट करत असल्याची तुफान चर्चा रंगत आहे.

भूषणने आज रोझ डे च्या निमित्ताने सुद्धा पूजासोबतचा एक फोटो शेअर करताना त्याला रोमँटिक कॅप्शन दिले आहे तर काही दिवसांपूर्वी सुद्धा दोघांचा एक रोमॅंटिक फोटो शेअर करत आमचं काय चालू आहे हे सांगू मात्र थोडी वाट पहा असे सांगितले होते.

भूषण प्रधान पोस्ट

 

View this post on Instagram

 

Do you need an answer? Can you wait for few more days?

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

पूजा सावंत पोस्ट

 

View this post on Instagram

 

Hey rose 🌹 Happy rose day ❤️

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant) on

दरम्यान, या फोटोत त्या दोघांची केमेस्ट्री अत्यंत चर्चेचा विषय ठरत आहे, आता हे प्रेम ऑनस्क्रीन बघायला मिळणार आहे की खरोखरच खऱ्या आयुष्यात हे दोघे जवळ आले आहेत हे तर तेच सांगतील, तोपर्यंत आपण केवळ वाट पाहायची आहे.