डान्सिंग क्वीन मानसी नाईक हिने प्रेमाची कबुली देत शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा फोटो
Mabsi Naik & Pradeep Kharera (Photo Credits: Instagram)

मराठीतील अशी डान्सर जी भल्या भल्या बॉलिवूड स्टार्स ना सुद्धा सहज मागे टाकेल अशी मानसी नाईक (Manasi Naik) हिने आपल्या प्रेमाची कबुली देत आपल्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाउंट वरून मानसी ने बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा (Pradeep Kharera) सोबतचा फोटो पोस्ट केला आहे. वाढदिवसानिमित्त स्वत:लाच मी प्रेमाची भेट देत आहे, असं म्हणत मानसीने प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. प्रदीपनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर मानसीसाठी रोमँटिक मॅसेज लिहिला आहे.‘माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी व्यक्ती यावी आणि तिने मला सांभाळून घ्यावं याच्याच प्रतीक्षेत मी होतो. मला माझ्यासारखीच प्रेमळ व्यक्ती सापडली आहे. आपल्या आवडीनिवडीसुद्धा एकसारख्याच आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मी तुझी साथ देईन’, असं प्रदीपने मानसीसाठी लिहिलं आहे.  Bill Gates Son-In-Law: बिल गेट्स यांच्या मुलीने निवडला जोडीदार; पहा कोण आहे 'हा' नशिबवान

मानसी स्क्रीनवर कितीही बोल्ड असली तरी आतापर्यंत तिने आपली लव्ह लाईफ मात्र पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवली होती. त्यामुळे अचानक आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा प्रदीप नेमका आहे कोण? तर प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. मागील काही काळापासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

पहा मानसी नाईक इन्स्टा पोस्ट

मानसी नाईक हिची ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ ही गाणी अफलातून हिट ठरली होती, तिने 'मस्त चाललंय आमचं', 'कुटुंब' या सारख्या सिनेमातून सुद्धा काम केले आहे. तर मराठी तारका सारख्या कार्यक्रमात सुद्धा तिने आपल्या नृत्याची जादू पसरवली आहे. मानसीने साध्य आपल्या प्रेमाची कबुली दिली असली तरी लग्नाची कोणतीही माहिती तिने अथवा प्रदीपने दिलेली नाही.