'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री
Pooja Hegde, Salman Khan (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 2021 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानसोबत कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री पूजा हेगडेची (Pooja Hegde) वर्णी लागली आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात पूजा हेगडेची वर्णी लागल्यानंतर तिने याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच सलमान खानसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचंही म्हटलं आहे. सलमान खानने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्दज अभिनेत्र्यांसोबत काम केले आहे. मात्र, आता 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात सलमान आणि पूजा हेगडेची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री कशी रंगते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (हेही वाचा  - अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी अभिनेता शहबाज खान विरोधात तक्रार दाखल)

पूजा 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात एका खेडेगावातील मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडीयादवाला यांनी मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये 'कभी ईद कभी दिवाली'च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सलमान आणि पूजाचे चाहते आतापासूनचं या चित्रपटातील वाट पाहतं आहेत.