Molestation Case FIR against Shahbaz Khan (PC - Wikimedia Commons)

अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी (Molestation Case) अभिनेता शहबाज खान (Shahbaz Khan) विरोधात तक्रार दाखल करण्यात (FIR) आली आहे. 19 वर्षांच्या मुलीने शहबाज विरोधात ओशिवरा पोलिस स्थानकात (Oshiwara Police Station) छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शहबाजची ओशिवरा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर शहबाजवर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

शहबाज खान हा प्रसिद्ध क्लासिकल सिंगर आमिर खान यांचा मुलगा आहे. शहबाजने आतापर्यंत अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. 'युग', 'द ग्रेट मराठा', 'बेताल पच्चीसी', 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. तसेच 'राम सिया के लव कुश', 'तेनाली रामा', 'दास्ता ए महोबत्त', 'फिर लौट आई नागिन', आदी मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने अनवाणी पायांनी 3 हजार 500 पायऱ्या चढत घेतले तिरुपतीचे दर्शन; पहा खास फोटो)

शहबाज खानविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल करण्यात आल्याने चित्रपटसृष्टीतील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, ओशिवरा पोलिस शहबाज खानची अधिक चौकशी करत आहे.