फोटो :  'निक जोनस'ने अशी साजरी केली आपली बॅचलरेट पार्टी
निक जोनस (photo credits: Instagram)

देशात सध्या तीन लग्नांची धूम चालू आहे. दीपिका रणवीर लग्नासाठी इटलीला रवाना झाले असून, लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. अंबानीकन्येची तीन लाखाची लग्नपत्रिका आपण सर्वांनी पहिलीच, तिकडे प्रियंकाही आपल्या Pre wedding ceremony मध्ये बिझी झाली आहे. प्रियंकाचा ब्रायडल शॉवर आणि बॅचलरेट पार्टी धुमधडाक्यात पार पडली. तमाम चाहत्यांनी अगदी कौतुकाने होणाऱ्या सासू-सुनेला ठुमके मारताना पहिले. अशातच आता निक जोनसनेही आपली बॅचलरेट पार्टी साजरी केली. निकने आपल्या Instagram वर बॅचलर पार्टीचे फोटो पोस्ट केले आहेत.

काळ्या रंगाच्या सुटमध्ये, हातात सिगर धरलेला निक या फोटोमध्ये अतिशय रुबाबदार दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Keep it classy.

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

तर या फोटोत निक डोक्यावर सेलरची हॅट घालून समुद्राकाठी आपली पार्टी एन्जॉय करत आहे.

 

View this post on Instagram

 

Bachelor party weekend is officially underway people @elit_vodka #distinguishedbytaste #lightupthenight #topshelfspirits #makeitelit

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

लग्नापूर्वी प्रियांकाने व्यावहारिक करार करत आपल्या लग्नाच्या फोटोंचे हक्क एका आंतरराष्ट्रीय मासिकाला विकले आहेत. तिने एका मासिकासोबत 2.5 मिलिअन डॉलर म्हणजेच जवळपास 18 कोटी 26 लाखांचा करार केला असल्याचे समजत आहे. सध्या असलेल्या माहितीनुसार हे लग्न 2 डिसेंबरला जोधपुर येथे होणार आहे.