Sacred Games 2 Trailer: 'सेक्रेड गेम्स 2' 15 ऑगस्ट पासून रसिकांच्या भेटीला
Sacred Games Season 2 trailer. (Photo Credits: YouTube/Screengrab/Netflix)

Sacred Games 2  Release Date: सेक्रेड गेम्स (Sacred Games) या नेटफिक्स इंडिया (Netflix India) च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर प्रेक्षकांना दुसर्‍या भागाची प्रतिक्षा होती. यंदा 15 ऑगस्ट 2019 पासून सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games 2 )ला सुरूवात होणार असल्याची अधिकृत घोषणा ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ‘जंग का वक्त आ गया है’म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळालं आहे. नव्या सीझनमध्ये कल्की कोचिन आणि रणवीर शौरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. Sacred Games Season 2 Teaser येथे पहा  

‘सेक्रेड गेम्स’चा ट्रेलर पहा

विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’या कादंबरीवर या वेब सीरीज देखील आधारित आहे. कल्की आणि रणवीर यंदा या सीझनमध्ये काय नव्हे ट्विस्ट आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. यापूर्वी सेक्रेड गेम्स मध्ये जितेंद्र जोशी, नेहा शितोळे यासारखे मराठी कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.