Sacred Games Season 2 Teaser (File Photo)

Sacred Games Season 2 Teaser Second: सेक्रेड गेम्स (Sacred Games) या नेटफ्लिक्सवरील (Netflix India) पहिल्या भारतीय वेब सीरीजने तमाम लोकप्रियता मिळवल्यानंतर आता दुसर्‍या भागाची आतुरता लागली आहे. आज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याची माहिती देणारा खास टीझर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये कल्की कोचिन (Kalki Koechlin), सैफ अली खान (Saif Ali Khan), नवाझउद्दीन सिद्धिकी (Nawazuddin Siddiqui) यांची झलक दाखवण्यात आली आहे. Sacred Games Season 2 टीझर : नेटफ्लिक्सवर पुन्हा रंगणार गणेश गायतोंडेचा थरार

Sacred Games Season 2 चा नवा टीझर

 

View this post on Instagram

 

Season 2 is coming. Put your chattris in the air. #SacredGamesS2

A post shared by Netflix India (@netflix_in) on

सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन नेमका कोणत्या दिवशी सुरू होणार? याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच सेक्रेड गेम्स सुरू होणार असं समजल्याने आता चाहत्यांमध्ये उत्सहाचं वातावरण आहे.

'सेक्रेड गेम्स 2' मध्ये कल्की कोचीन ही अभिनेत्री प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अनुराग कश्यप आणि नीरज घायवान यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. नवाजुद्दीन आणि सैफ ची जुगलबंदी या ही वेळेस प्रेक्षकांवर छाप पडण्यास यशस्वी होईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.