National Film Award: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारचा आज वितरण सोहळा, अभिनेत्री आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित तर अभिनेता अजय देवगणला तानाजी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार

दिल्लीत (Delhi) आज राष्ट्रीय चित्रपट सोहळा (National Film Award) पार पडला. या सोहळ्यात विविध नामवंत कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले असुन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी देखील या पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती. अभिनेता अजय देवगणला (Actor Ajay Devgan) तानाजी (Tanaji-The Unsung Warrior) चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) दादासाहेब फाळके पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. संगीतकार विशाल भारद्वाज (Music Composer Vishal Bhardwaj) यांना '१२३२ किमी' (1232 Km) या शॉर्ट फिल्म (Short Film) मधील 'मरेंगे तो वहीं जा कर' (Marenge Toh Wohi Ja Kar) या गाण्यासाठी (Song) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा (Best Music composer) राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला.

 

या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट सृष्टीचा (Marathi Film Industry) देखील मोठा बोलबाला बघायला मिळाला. '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात 'गोष्ट एका पैठणीची' (Gosht Eka Paithanichi) या सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा'चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रोडे (Shantanu Rode) यांचे असून ‘प्लॅनेट मराठी’ने (Planet Marathi) त्याची निर्मिती केली आहे. अक्षय बद्रापूरकर (Akshay Bdrapurkar) आणि शंतनू रोडे (Shantanu Rode) यांनी रजत कमळ (Rajat Kamal) पुरस्कार स्वीकारला. तर राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) प्रदान आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' (Mi Vasantrao) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'गोदाकाठ आणि अवांछित' (Godakath Aani Awanchhit) या सिनेमासाठी किशोर कदम (Kishor Kadam) यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर 'जून' (June) सिनेमासाठी सिद्धार्थ मेननला (Siddharth Menon) विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

पराया (Paraya) चित्रपटाला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. पुण्याच्या (Pune) एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (MIT School Of Film And Television) यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा पुरस्कार मंगेश कराड (Mangesh Karad) आणि दिग्दर्शक विशेष अय्यर यांनी स्वीकारला. कुंकुमार्चन (Kunkumarchan) या चित्रपटाला कौटुंबिक मुल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटासाठीचे रजत कमळ (Rajat Kamal) देण्यात आले. पुष्कर तांबोळी (Pushkar Tamboli) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. चित्रपटाची निर्मिती ‘स्टुडिओ फिल्मी माँक्स’ यांची तर अभिजीत दळवी (Abhijeet Dalavi) यांचे दिग्दर्शन आहे.