Photo Credit- X

Pritam Chakraborty: मालाड पोलिसांनी संगीतकार प्रीतम चक्रवर्ती (Pritam Chakraborty) याच्या स्टुडिओमधून पैसे चोरल्याप्रकरणी त्याचा ऑफिस बॉय आशिष सायल 32 वर्ष याला अटक केली आहे. पोलिसांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये आरोपीला अटक केली आणि शुक्रवारी त्याला मुंबईत आणले. स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या सायलने 4 फेब्रुवारी रोजी 40 लाख रुपयांची बॅग चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो पळून गेला. मालाड पोलिसांनी 5 फेब्रुवारी रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. Aditya Pancholi Parking Row Case: पार्किंग वाद प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोलीला मोठा दिलासा; न्यायालयाने शिक्षा कमी करून दिले नुकसानभरपाई देण्याचे आदेश

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी म्हटले की, त्यांनी चोरीच्या रोख रकमेपैकी 95% रक्कम जप्त केली. चोरी केल्यानंतर, त्याने संपूर्ण रात्र मुंबईच्या उपनगरातील विविध भागात घालवली. आधी तो कांदिवलीला ऑटोरिक्षा तून गेला. नंतर तो मार्वे रोडला गेला, मालवणीला दुसरी ऑटोरिक्षा घेऊन चारकोपला चालला. त्यानंतर तो तिसरी ऑटोरिक्षा घेऊन समता नगर येथे उतरला आणि चौथी ऑटोरिक्षा घेऊन वर्सोवाला गेला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने जवळजवळ 10 तास प्रवास केला."

पोलिसांनी आठ दिवसात 200 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यांना तो शेवटचा वर्सोवा येथे आढळला. तपासात त्यांना तो जम्मू आणि काश्मीरला पळून गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तेथे पाठवण्यात आले. हॉटेल आणि रस्त्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांनी त्याला जम्मू आणि काश्मीरमधील सांबा रेल्वे स्टेशन परिसरात शोधले. जिथे त्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्याला 36.91 लाख रुपये, एक लॅपटॉप आणि आयफोन जप्त केला. त्याला आज पहाटे ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.