Baiju Bawra साठी सेलिब्रिटी खेळतायत संगीत खुर्ची; आता Hrithik Roshan ची वर्णी लागण्याची शक्यता
Hrithik and Bhansali together? | (Instagram & PTI)

संजय लीला भन्साळी यांचा 'इन्शाल्लाह' हा सलमान आणि आलिया सोबतच चित्रपट गुंडाळला गेल्यानंतर ते जोमाने कामाला लागले आहेत. एकीकडे इन्शाल्लाह बंद करत असल्याची घोषणा करत असतानाच त्यांनी आलिया सोबतच 'गंगुबाई काठियावाडी'ची देखील घोषणा करून टाकली. तर दुसरीकडे थोड्याच दिवसात 'बैजू बावरा' या अजून एका भव्य दिव्य चित्रपटाची घोषणा केली. तेव्हापासूनच या चित्रपटामध्ये बैजू बावरा कोण साकारणार याची चर्चा सुरु झाली.

आधी अजय देवगण ही भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण नंतर असं उघड झालं की अजयला तानसेनच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. त्याने ती नाकारली. दुसरीकडे भन्साळीचा हुकुमी एक्का रणवीर सिंग ज्याने 3 सुपरहिट चित्रपट सोबत दिले आहेत, शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं गेलं. परंतु आता हा संगीत खुर्चीचा खेळ थांबायची शक्यता असून ह्रितिक रोशनची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (हेही वाचा. मला आधीपासूनच ठाऊक होतं Cancer आहे; Hrithik Roshan चे वडील Rakesh Roshan यांचा खुलासा)

बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, ह्रितिक आणि भन्साळी गेले काही दिवस या विषयावर चर्चा करत आहेत. वॉरच्या यशानंतर खरे तर ह्रितिकने असेच व्यावसायिक चित्रपट करण्याचं ठरवलं होतं. परंतु बैजू बावराची कथा त्याला आवडली असून अशा प्रकारची भूमिका स्विकारण्याचं आव्हान पेलायची ह्रितिकची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसातच याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ह्रितिक आणि भन्साळी तब्बल 9 वर्षांनंतर एकमेकांसबत काम करतील. 2010 साली आलेल्या 'गुजारिश' मध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटातील ह्रितिकच्या कामाचंही खूप कौतुक झालं होतं.