मुंबई विद्यापीठात आज पासून रंगणार चित्रपट महोत्सव; ग्रामीण महाराष्ट्राचे दर्शन घडवणाऱ्या कथा जाणून घेण्याची संधी
Mumbai University Film Festival (Photo Credits: Pixabay)

साहित्यकार अण्णाभाऊ साठे (Anna Bhau Sathe) यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University)  पत्रकारिता विभाग आणि फुले-आंबेडकर अध्यासन व संज्ञापन यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून एक अनोखा चित्रपट महोत्सव सुरु होणार आहे. 16 डिसेंबर 2019 ते 19 डिसेंबर 2019 ह्या कालावधीत सकाळी 9 ते संध्याकाळी 9 अशा वेळात पाच सत्रात "मराठी चित्रपटातील ग्रामीण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व" या विषयावर या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. (पुणे: 9 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान रंगणार Pune International Film Festival चा सोहळा; जाणून घ्या डीटेल्स)

या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला असून अधिकाधिक लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी व व्यवस्थापक मंडळाकडून करण्यात आले आहे. चित्रपटांच्या मुख्य प्रवाहात कमर्शियल सिनेमाचा बोलबाला असताना ग्रामीण विषय मांडण्यासाठी हे एक पाऊल आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

कुठे: मुंबई विद्यापीठ, जे. पी. नाईक भवन

वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 9

चित्रपट महोत्सव व राष्ट्रीय चर्चासत्र वेळापत्रक

आज या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन चित्रपट लेखक-दिग्दर्शक- सागर सरहदी, मराठी चित्रपट दिग्दर्शक- सतीश रणदिवे, नाटककार- प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेश खरात तर स्वागत प्रमुख म्हणून डॉ.अनिल सपकाळ व डॉ.संजय रानडे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच , 19 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्यसमीक्षक जयंत पवार, सुप्रसिद्ध पटकथा संवाद लेखिका मनीषा कोरडे यांची उपस्थिती असणार आहे.