मुंबई पोलिसांनी शुक्रवारी गोरेगाव (Goregaon) परिसरातील वेस्टीन हॉटेलमधील (Westin Hotel) सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. दरम्यान, अभिनेत्री अमृता धनोआ (Amrita Dhanao) आणि मॉडेल रिचा सिंह (Richa Singh) या दोघीही त्या ठिकाणी आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, अमृता धनोआ हिने आपल्या एक्स बॉयफ्रेंड अरहान खान (Arhaan Khan) याच्यासंदर्भात खळबळजनक वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष केंद्रीत केले आहे. अरहान खान यानेच आम्हाला फसवले आणि यात ढकलेले असा आरोप अमृता हिने केला आहे, अशी माहिती 'आजतक'ने दिली आहे.
मुंबई सारख्या शहरात सेक्स रॅकेटच्या अनेक घटना घडत असून याला आळा घालण्यासाठी मु्ंबई पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. यातच गोरेगाव परिसरातील वेस्टीन हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतरस त्यांच्याच गटातील एका पोलीस अधिकाऱ्याने ग्राहक म्हणून एका महिलेशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिसांनी अभिनेत्री अमृता धनोआ आणि मॉडेल राची सिंह हिला ग्राहकांकडून पैसे घेत असताना रंगे हाथ पकडले. पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान अमृता हिने आपल्या एक्स बॉयफ्रेंड याचे खापर फोडले आहे. आम्हाला फसवण्यात आले आहे. ही छापेमारी एका मोठ्या कटाचा भाग असून हे सर्व अरहान याने केले आहे, असा आरोप अमृता हिने केला आहे. तसेच पोलिसांचा काही गैरसमज झाला असून आम्ही एक छोटीशी पार्टी करत होतो, असेही ती म्हणाली आहे. हे देखील वाचा-मुंबई: गोरेगाव परिसरातील एका हॉटेलमधील SEX रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह एक मॉडेल अटकेत
दरम्यान, दिंडोशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धर्मेंद्र कांबळे यांनी सांगितले की, 32 वर्षीय अमृता धानोआ आणि 26 वर्षीय रिचा सिंग यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 370 (3), 34 आणि अनैतिक प्रतिबंधक कलम 4,5 अन्वये अटक करण्यात आली आहे.