सत्यघटनेवर आधारित 'द स्काय इज पिंक' आणि 'लूटकेस' येत आहेत प्रेक्षकांच्या भेटीला
Movie Releases | (Picture credit: Instagram)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) बहुचर्चित ' स्काय इज पिंक ' (The sky is pink) या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 'प्रियांकाचा कमबॅक' असे या चित्रपटाकडे पहिले जात आहे. तब्बल 3 वर्षांनंतर ती बॉलीवूड मध्ये काम करते आहे. या आधी 2016 ला आलेला प्रकाश झा (Prakash Jha) यांचा 'जय गंगाजल ' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर हॉलिवूडची वाट धरल्याने आणि निक जोनास सोबत झालेल्या विवाहामुळे तिच्या बॉलीवूड करिअरला ब्रेक लागले होते.

आयेशा चौधरीच्या 'माय लिटल एपिफनीज ' (My little epiphanies) पुस्तकावर आधारित या चित्रपटात एका जोडप्याचा 25 वर्षांचा प्रवास, 'पल्मनरी फायब्रोसिस ' म्हणजेच श्वसनाचा आजार झालेल्या आणि मृत्यूशी झुंजणाऱ्या त्यांच्या मुलीच्या नजरेतून दाखवण्यात आला आहे. आयेशाचे हे पुस्तक तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोनाली बोस (Shonali bose) यांनी केले आहे. हा चित्रपट 'दंगल ' फेम झायरा वासिमचा शेवटचा चित्रपट असणार आहे. (हे वाचा. अभिनेत्री झायरा वासीम हिची बॉलिवूडमधून एक्झिट)

तर दुसरीकडे, राजेश कृष्णन दिग्दर्शित 'लूटकेस ' (Lootcase) हा चित्रपटही प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात कुणाल खेमू (Kunal Khemu)आणि रसिक दुग्गल मुख्य भूमिकेत आहेत. सोबतच, रणवीर शोरी, विजय राज आणि गजराज राव अशी तगडे सहकलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन राजेश कृष्णन आणि कपिल सावंत यांनी केले आहे. एका लाल सुटकेसच्या अवतीभवती फिरणारी अशी हि सिचुएशनल कॉमेडी असणार आहे.