Met Gala 2019: मेट गाला मधील प्रियांका चोप्रा हिच्या गाऊनची किंमत चक्क 45 लाख रुपये, निकचे घड्याळ 38 कॅरेट हिऱ्यांचे
Priyanka Chopra and Nick Jonas (Photo Credits- Instagram)

Met Gala 2019: न्यूयॉर्क (New York) येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट हॉलमध्ये मेट गाला 2019 चे आयोजन करण्यात आले होते. तर देशभरातील दिग्गज मंडळींनी यावेळी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. त्यामध्ये बॉलिवूड मधील अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सुद्धा एका हटके अंदाजात दिसून आल्या. परंतु सोशल मडियावर प्रियांका चोप्रा हिच्या लूकवरुन तिला ट्रोल करण्यात आले आहे.

मेट गालामध्ये प्रियांका सोबत निकसुद्धा दिसून आला. मात्र प्रियांका चोप्रा हिचा लूक पाहून अनेकांनी तिची खिल्ली उडवली. परंतु प्रियांकाच्या या सफेद गाऊनची किंमत तब्बल 45 लाख रुपये असल्याचे सांगितले जात असून Dior ब्रँन्डचा होता. तर निक जोनस ह्याने हिऱ्याची आभुषणे घातलेला दिसून आला. त्यामध्ये निकने जे घड्याळ घातले होते त्यावर 38 कॅरेटचे हिरे लावण्यात आले होते. त्याची किंमत जवळजवळ 20 लाखापेक्षा अधिक असून व्हाईट गोल्डने तयार केले होते.(Met Gala 2019: प्रियांका चोप्रा मेट गाला मधील लूकवरुन सोशल मीडियात ट्रोल)

 

View this post on Instagram

 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका चोप्रा तिचा आगामी चित्रपट द स्काय इज पिंक मध्ये झकळणार आहे. यामध्ये फरहान अख्तर सुद्धा मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. शोनाली बोस चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.