पुलवामा येथे जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) दहशतवादी संघटने सीआरपीएफच्या दहशतवाद्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा आज भारतीय वायुसेनेने बदला घेतला. मागील बारा दिवसांपासून देशभरामध्ये संतापाचं वातावरण होतं. मात्र आज करण्यात आलेल्या एअर अटॅकमुळे दहशतवादी संघटनेचा तळ उद्धवस्त करण्यामध्ये भारतीय जवानांना यश आलं आहे. शेकडो दहशतवादी आज मारले गेले. त्यामुळे पुलावामा दहशतवादी हल्ल्याचा(Pulwama Terror Attack) बदला घेतल्यानंतर आज सामान्यांसोबतच मराठी क्षेत्रातील कलाकारांनीदेखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
योगेश सोमण
अभिनेता योगेश सोमण यांनी आज भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईल करून एक उत्तम अदरांजली दिली आहे. सोबतच पुणे पोलिसांनी यामधून धडा घ्या. मूकबधिरांच्या मोर्च्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचंदेखील त्यांनी निषेध केला आहे.
सोनाली कुलकर्णी
मयुरी देशमुख
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी भारतीय सैन्याने साजरी केली, आज पहाटे! खऱ्या अर्थाने 'हे अधम रक्तरंजिते' म्हटलं आहे.
सिद्धार्थ चांदेकर
अभिनय बेर्डे
भारतावर यापुढे भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत हे आज भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईकने दाखवून दिले आहे. 14 फेब्रुवारीच्या दुपारी भारतामध्ये पुलवामा भागात सुट्टी संपवून परतणार्या
सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान जागीच ठार झाले होते.