जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर (फोटो सौजन्य- ट्वीटर)

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे सोमवारी (4 फेब्रुवारी) दु:खद निधन झाले आहे. नेपेन्सी रोड येथील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. तर रमेश भाटकर हे कर्करोगाने ग्रस्त होते.  या घटनेने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

रमेश भाटकर यांनी 'कमांडर' आणि 'हॅलो सखी' या टीव्ही मालिकांमधून झळकले होते. तसेच अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका यशस्वीपणे साकारल्या होत्या. अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसे या चित्रपटातून रमेश भाटकर झळकले होते.रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. (हेही वाचा-ज्येष्ठ मराठी विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन)

1977 रोजी रमेश भाटकर यांनी मराठी सृष्टीत पाऊल ठेवत पदार्पण केले होते. तसेच तीन वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केले. तर पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. तसेच हिंदी चित्रपटांमधून ही रमेश भाटकर यांनी विविध भुमिका साकारल्या होत्या.