ज्येष्ठ मराठी विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन
जेष्ठ अभिनेते किशोर प्रधान (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबई,जानेवारी 12 : मराठी आणि इंग्रजी चित्रपटांतून अनेक विविध भुमिका साकारुन प्रेक्षकांना मनमोकळेपणाने हसायला लावणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान (Kishore Pradhan) यांचे आज दु:खद निधन झाले आहे. किशोर प्रधान यांनी वयाच्या 82 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

किशोर प्रधान यांना त्यांच्या आई मालतीबाई यांच्यामुळे नाटकाची आवड लागली होती. पुढे महाविद्यालयातून त्यांनी एकांकिकांमधून आपले रंगभूमीवर पाऊल ठेवले. तसेच मराठी, इंग्रजी, सिनेमा आणि जाहिरांतीमध्ये ही प्रधान यांनी आपली भुमिका योग्यतेने बजावली होती.

तर मराठी चित्रपट 'नवरा माझा ब्रम्हचारी', 'भिंगरी', 'डॉक्टर डॉक्टर', 'लालबाग परळ' यांसारखे अनेक चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत. तसेच 'लगे रहो मुन्नाभाई' मधील आजोबा आणि 'जब वुई मेट' मधील स्टेशन मास्तर अशा भूमिका बॉलिवूडमध्ये ही पार पाडल्या आहेत.