Ka Mann He Song:  वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांचं नवं रोमॅंटिक गाणं 'का मन हे' रसिकांच्या भेटीला
Ka Mann He Song (Photo Credits: You Tube)

Ka Mann He Song:  वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)या सुपरहीट जोडीचा नवा सिनेमा 'रेडीमिक्स' (Readymix)यंदा व्हॅलेंटाईन डे विकमध्ये येण्यासाठी सज्ज आहे. टीझर आणि ट्रेलरला रसिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता या सिनेमाचं पहिलं रोमॅन्टिक गाणं रसिकांसमोर आलं आहे. 'का मन हे' (Ka Mann He) हे रोमॅन्टिक गाणं वैभव आणि प्रार्थना बेहरेवर चित्रित करण्यात आलं आहे. Readymix Trailer: वैभव - प्रार्थना आणि नेहाचा लव्हट्रॅंगल रूपेरी पडद्यावर यंदा Valentine Day Week मध्ये खुलणार, पहा धमाकेदार ट्रेलर

'का मन हे' हे गाणं आर्या आंबेकर आणि फर्हाद भिंवडीवाला यांनी हे गाणं गायलं आहे. तर अविनाश - विश्वनाथ या जोडीचं या गाण्याला संगीत आहे. अश्विनी शेंडें यांनी या गाण्याचे शब्द लिहले आहेत. रेडीमिक्स हा सिनेमा एक लव्ह ट्रॅंगल आहे. वैभव तत्त्वावादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी या तीन कलाकारांनी साकारलेल्या पात्रांच्या आयुष्यात रिलेशनशिपमधील गुंता या सिनेमात दाखवण्यात आला आहे.

वैभव- प्रार्थना या जोडीने अनेक रोमॅंन्टिक सिनेमे केले आहेत. यंदा व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातच त्यांच्या चाहत्यांना अजून एक नवा सिनेमा पहायला मिळणार आहे.रेडीमिक्स या सिनेमाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार (Jalindar Kumbhar)यांनी केलं आहे. अमेय खोपकर यांनी कृती फिल्म्स आणि सोमिल क्रिएशन्स यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रीलिज होणार आहे.