Readymix Trailer (Photo Credits: Instagram)

Readymix Trailer:  वैभव तत्त्ववादी (Vaibhav Tatwawaadi) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या जोडीचा अजून एक नवा रोमॅन्टिक सिनेमा यंदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवसात रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यंदा वैभव तत्त्ववादी एका लव्ह ट्रॅंगलचा भाग आहे. 'रेडीमिक्स' (Readymix) या आगामी मराठी सिनेमामध्ये वैभव, प्रार्थना सोबत अभिनेत्री नेहा जोशी (Neha Joshi) झळकणार आहे. आजची तरूणपिढी आणि रिलेशनशीपमध्ये अडकल्यानंतर नात्यांचा होणारा गुंता या विषयावर 'रेडीमिक्स' सिनेमाची काहाणी गुंफलेली आहे. आज या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

'SOME CHOICES ARE DIFFICULT TO MAKE' अशी या सिनेमाची टॅग लाईन आहे. रेडीमिक्स या सिनेमाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार (Jalindar Kumbhar)यांनी केलं आहे. अमेय खोपकर यांनी कृती फिल्म्स आणि सोमिल क्रिएशन्स यांच्यासोबत या सिनेमाची निर्मिती केली आहे. 8 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रीलिज होणार आहे. या सिनेमासोबत 'भाई- व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचा उत्तरार्ध रीलिज होणार आहे.