Navra Maza Navsacha 2: अशोक मामा आणि सचिन पिळगावकर जोडी पुन्हा एकदा पडद्यावर झळकणार, 'या' चित्रपटाचा भाग 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Navra Maza Navsacha 2 PC INSTA
Navra Maza Navsacha 2: मराठी चित्रपटांत आज ही अजरामर असलेला चित्रपट म्हणजे नवरा माझा नवसाचा. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया यांच्या भुमिकेने चित्रपटाला एका वेगळ्यांच उंचीवर आणून ठेवल. मराठी चित्रपट वर्गाचा प्रेक्षक आजही हा चित्रपट आवर्जून पाहतात. मराठी चित्रपट पाहण्याऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्यानंतर तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा भाग दोन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक मामा आणि सचिन पिळगावकर यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे.
अखेर 'या' चित्रपटचा मुहूर्त ठरल्याची माहिती मिळत आहे. नवरा माझा नवसाचा  2 या सिनेमाचं शूटिंगला लवकरच श्री गणेशा होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी सोशल मीडियावर शूटींग संदर्भात माहिती दिली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहलं आहे की, ,"नवरा माझा नवसाचा 2' शूटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या". (हेही वाचा-  दुलकर सलमानला चित्रपटसुष्टीत 12 वर्ष पुर्ण, केली नव्या सिनेमाची घोषणा)

प्रेक्षकांनी या पोस्टवर कंमेटचा वर्षाव केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते हे सचिन पिळगावकर असणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाची गाणी देखील आजवर प्रसिध्द आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उद्यापासून सुरुवात होणार असल्याने लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.