मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ((Prajakta Mali) हिने एका रियॅलिटी शो दरम्यान ड्रेस डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याचे आरोप तिच्यावर लावण्यात आले होते. त्यानुसार मनचंदा हिने पोलिसात तक्रार सुद्धा केली होती. तेव्हा प्राजक्ता हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र बुधवारी ठाणे दंडाधिकारी न्यायालयात प्राजक्ता हिला सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. परंतु प्राजक्ता त्यावेळी उपस्थित राहिली नाही. त्यामुळे प्राजक्ता गैरहजर राहिल्याने तिला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण?
एप्रिल मध्ये जान्हवी मनचंदा व प्राजक्ता मध्ये एका कार्यक्रमाच्या सेट वर कपड्यांवरून वाद झाला होता, डिझायनर ड्रेसमध्ये प्राजक्तानी कात्री घेऊन छेडछाड केली व यावरून तिला विचारणा केल्यावर तिने भांडायला सुरवात केली त्यानांतर सगळं राग आपल्यावर काढत प्राजक्तानी व्हॅनिटी व्हॅन मध्ये बोलवून मारहाण व शिवीगाळ केली अशी माहिती जान्हवी यांनी दिली आहे.(नकटीच्या डोक्यावर विघ्नांचा भार, डिझायनरला मारहाण केल्याने प्राजक्ता माळी विरोधात कोर्टात तक्रार)
यापूर्वी देखील प्राजक्ताचा स्वभाव रागीट असल्याने वाद झाले होते मात्र तिनेच आपल्याला काम दिल्याने आजवर सहन करत राहिले, यावेळी परिस्थिती हाता बाहेर गेली असल्याने हे पाऊल उचलायला लागत आहे असे जान्हवी यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितले होते.