‘मोगरा फुलला’ सिनेमातील Swwapnil Joshi च्या लुकची पहिली झलक
Swwapnil Joshi (Photo Credits: Twitter)

Mogra Phulaalaa Swwapnil Joshi Look: अभिनेता स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi) चॉकलेट बॉय ते खलनायक अशा विविध रूपांमध्ये रसिकांच्या भेटीला आला. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वप्निल जोशीच्या आगामी 'मोगरा फुलला' सिनेमातील एक खास झलक रसिकांच्या भेटीला आली आहे. स्कूटरवर बसलेला एका सामान्य व्यक्तीच्या रूपात स्वप्निल जोशी दिसत आहे. या सिनेमामध्ये साकरणार्‍या स्वप्निल जोशीच्या पात्राचं नाव 'सुनील कुलकर्णी' (Sunil Kulkarni) आहे.

'मोगरा फुलला'  सिनेमातील स्वप्निल जोशीचा लूक 

'मोगरा फुलला' हा सिनेमा श्रावणी देवधर दिग्दर्शित करणार आहे. लपंडाव, सरकारनामा, लेकरू या दमदार सिनेमाचं दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केलं आहे. 'मोगरा फुलला' या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. 'मोगरा फुलला' ही एक रोमॅन्टिक कहाणी आहे.

'मी पण सचिन..' या सिनेमात क्रिक्रेटवेड्या तरूणाची भूमिका स्वप्निल जोशीने साकारली होती. बॉक्सऑफिसवर या सिनेमाने फारशी दमदार कामगिरी केलेली नाही.