Marathi Movie News: निर्मीती क्षेत्रात स्वप्नील जोशीची एन्ट्री, नव्या सिनेमाची केली घोषणा
swapnil joshi

मराठी चित्रपटसुष्टीतला अभिनेता स्वप्नील जोशी आता एक नवी सुरुवात करणार आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्यासाठी स्वप्नील जोशी आता निर्माता म्हणून भेटीला येणार आहे. स्वप्नील सध्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. सोशल मीडियावर त्यांनी नव्या चित्रपटपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातून स्वप्नील नवी सुरुवात म्हणजे, निर्मितीत पदार्पण करणार आहे. नाच गं घुमा या मराठी चित्रपटातून निर्मीतीची सुरुवात करणार आहे.  स्वप्नील जोशीने घटनस्थापनेच्या शुभ  मुहुर्तावर चाहत्यांसाठी ही खास भेट दिली आहे.

वाळवी फेम दिग्दर्शक परेश मोकाशी ही या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे मोशम पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटले की, काम करत असताना कलाकार म्हणून माझ्या निर्मात्यांनी माझ्यावर खुप प्रेम केलं.  माझ्या स्वप्नांना बळ दिलं. कदाचित म्हणूनच हे धाडस! मित्रांच्या मदतीने, सह-निर्माता म्हणून मी माझा एक नवीन प्रवास सुरु करत आहे. आईचा आशीर्वाद आहेच, तुमचा ही असुद्या!' या सोबत चित्रपटाची रिलीज डेट जारी केली आहे.

चाहत्यांना सप्राईज म्हणून या चित्रपटात नेमकं कोण कलाकार असणार या संदर्भात कोणतीही माहिती समोर दिली नाही. हा चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.