Dokyala Shot Trailer: 'बालक पालक,' 'येलो' यांसारखे हटके सिनेमे दिल्यानंतर उत्तुंग ठाकूर निर्मित एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'डोक्याला शॉट' (Dokyala Shot) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'डोक्याला शॉट' हा सिनेमा म्हणजे चार क्रेझी मित्रांची कथा आणि एक आगळवेगळी प्रेमकथा. या सिनेमात एक मराठमोळा मुलगा 'शुभू' नावाच्या एका साऊथ इंडियन मुलीच्या प्रेमात पडतो आणि ते दोघेही लग्न करायचे ठरवतात. लग्नाची सर्व तयारी होते आणि लग्नाच्या दोनच दिवस आधी मित्रांसोबत क्रिकेट खेळताना त्याच्या डोक्याला दुखापत होते. या अपघातात त्याची स्मृती जाते आणि अचानक त्याला लग्नाबद्दल काहीच आठवेनासे होते. त्यानंतर मित्रांना वाटणाऱ्या भीतीपोटी त्याचे मित्र काय काय करतात, याची गोष्ट म्हणजे 'डोक्याला शॉट.'
पहा सिनेमाचा ट्रेलर:
सिनेमात सुव्रत-प्राजक्ता यांच्यासोबतच रोहित हळदीकर, गणेश पंडीत आणि ओमकार गोवर्धन हे कलाकारही आहेत. शिवकुमार पार्थसारथी (Shivkumar parthasarathy) दिग्दर्शित हा सिनेमा 1 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी ही जोडी 'पार्टी' सिनेमात एकत्र झळकली होती.