Subodh Bhave (Photo Credits: Instagram/FIle)

आपल्यातील कलाकौशल्यातील जोरावर, अफाट मेहनत आणि कष्ट करुन आज चित्रपट, मालिका आणि नाटक या तीनही विभागात भक्कम पाय रोवून असलेला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) याचा आज जन्मदिवस. सुबोधचा जन्म 9 नोव्हेंबर 1975 रोजी झाला. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या सुबोध ने नाटकांमधून या क्षेत्रात पदार्पण केले. सुबोधने आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपटात तर 40 हून अधिक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. नेहमी मराठी सिनेसृष्टीला आणि मालिकांना प्राधान्य देणे हाच सुबोधचा मुख्य उद्देश राहिला आहे. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. सध्या त्याची आगामी मालिका 'चंद्र आहे साक्षीला' (Chandra Aahe Sakshila) या मालिकेचा प्रोमो तुफान लोकप्रिय होत आहे. त्याला कारण हा प्रोमो तितक्याच ताकदीचा बनविण्यात आला आहे. या प्रोमोमुळे प्रेक्षकांची या मालिकेबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

म्हणूनच सुबोधने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या मालिकेच्या प्रोमोमागची कहाणी सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सुबोध भावे, अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि मालिकेच्या सर्व टीमची मेहनत दिसत आहे. हेदेखील वाचा- Chandra Aahe Sakshila Serial: 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेचा पहिला प्रोमो आला समोर, सुबोध भावे सह 'ही' अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत

पाहा व्हिडिओ:

या मालिकेत सुबोध श्रीधर काळे ही भूमिका साकारताना दिसणार आहे. यातील प्रेमकहानीमध्ये एक रहस्य सांगण्यात येत आहे. मात्र हे गुपित काय असणार हे मालिका पाहिल्यावरच कळेल.

चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे निभावणार आहे. 11 नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.