अभिनेता स्वप्निल जोशीच सोशल मिडिया अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न; स्वतःहा स्वप्निल ने दिली माहिती,पाहा व्हिडिओ
Photo Credit : Instagram

सेलेब्रिटींचे सोशल मिडिया अकाउंट्स हॅक होण हे काही नवीन नाही. सतत आपण अशा बातम्या ऐकत असतो.आता या गोष्टीचा सामना अभिनेता स्वप्निल जोशी ला ही करावा लागला आहे.पण सुदैवाने त्याच अकाउंट्स हॅक होता होता वाचल आहे.अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र हा प्रयत्न स्वप्नीलच्या आयटी टीमला ही गोष्ट वेळीच लक्षात आली आणि त्यामुळे अकाउंट्स हॅक करणाऱ्याचा प्रयत्न फसला आहे.अभिनेता स्वप्नील जोशीने स्वतःहा त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.   (Bollywood Drug Case: बॉलिवूड मधील ड्रग्ज माफियांबद्दल तपास करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे NCB कडून निलंबन, विभागीय चौकशी करण्याचे आदेश)

त्याच अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न कसा झाला हे त्याने सांगितले आहे.सतत पासवर्ड मागण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही स्वप्नील जोशीने स्पष्ट केलं. या व्हिडिओमध्ये माहीती देताना स्वप्नील म्हणतो, 'काल माझं अकाऊंट हॅक होतंय की काय असं मला वाटलं. कारण, मला इन्स्टाग्राम सपोर्ट या अकाऊंटवरून काही मेसेज आले. या अकाऊंटला टीक आहे. शिवाय त्याचे फॉलोअर्सही जवळपास 77 हजार वगैरे आहेत. त्या लोकांनी मला मी काहीतरी चुकीचा कंटेंट टाकल्याची माहीती मला दिली. याबद्दल मी माझ्या सोशल मीडिया टीमला याबद्दल माहीती दिली. सुरूवातीला मला काळजी वाटली. कारण जवळपास एक मिलियन फॉलोअर्सचं हे अकाऊंट आता माझ्या हातून जातंय का काय असं मला वाटलं. पण माझी सोशल मिडीया टीमने याबद्दल नीट माहिती घ्यायला सुरुवात केली. या अकाऊंटद्वारे सतत माझ्या पासवर्डची मागणी होत होती. जवळपास दोन अडीच तास हा प्रकार सुरू होता. पण मी तो दिला नाही. मी माझ्या सर्व चाहत्यांना, मित्रांना सांगू इच्छितो की कृपया आपला पासवर्ड कुणालाही देऊ नका. माझं अकाऊंट हॅक व्हायचा प्रयत्न होतोय हे आमच्या लक्षात आलं. आम्ही याविरोधात लढलो आणि हा हॅक व्हायचा प्रयत्न शेवटी मी हाणून पाडला आहे. असं मला वाटतं.'

स्वप्नील जोशी हे मराठी आणि हिंदी सिने-टीव्हीसृष्टीत नावाजलेलं नाव आहे.त्यामुळे त्याच्या सोशल मिडीयावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे जवळ जवळ 1 मिलियन म्हणजे 10 लाख फॉलोअर्स आहेत.