'Smile Please' Anthem Teaser: महेश मांजरेकर, उर्मिला मातोंडकर सह अनेक मराठी कलाकारांची फौज असलेला 'चल पुढे चाल तू' गाण्याचा टीजर प्रदर्शित
Smile Please Anthem (Photo Credits: Youtube)

विक्रम फडणीस दिग्दर्शित 'Smile Please' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्माईल प्लिज चित्रपटाच्या अँथमचा टीजरही आता प्रदर्शित झाला आहे. अनेक दिग्गज आणि नामांकित अशा मराठी कलाकारांच्या मांदियाळीत नटलेले हे गाणे प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. 'चल पुढे चाल तू' असे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार म्हणजेच मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, दिग्दर्शक विक्रम फडणीस (Vikram Phadnis) तसेच प्रसाद ओक हे कलाकार दिसणार आहेत.

'चल पुढे' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन रोहन रोहन यांनी केले असून मंदार चोळकर यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्यासह बेला शेंडे, मुग्धा कऱ्हाडे, रोहन प्रधान, सचिन पिळगावकर तसेच ग्वेन डीआस यांनी हे गाणे गायल्यामुळे गाण्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या गाण्याचा टीजर प्रदर्शित झाला असून लवकरच हे पूर्ण गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या गाण्यात तुम्हाला महेश मांजरेकर, उर्मिला मातोंडकर, सई लोकुर, सोनाली खरे, प्रिया बापट, तेजस्विनी प्रधान, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकर, स्पृहा जोशी, मानसी नाईक, प्रार्थना बेहरे, भूषण प्रधान यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -Smile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा

'स्माईल प्लिज' या आगामी चित्रपटात मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर, वेदश्री महाजन हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील. 'स्माईल प्लिज' हा चित्रपट 19 जुलैला महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.