जोगवा फेम अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्माईल प्लिज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जूनमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर अलीकडेच 32 कलाकारांच्या मांदियाळी नटलेले स्माईल प्लिज (Smile Please) या चित्रपटाचे अँथम 'चल पुढे' प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती पावती मिळाली आहे. आता नुकतेच या चित्रपटातील 'अनोळखी' (Anolkhi) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नात्यांतील गुंफण अगदी अलगदपणे मांडणारे हे गाणे एव्हरेस्ट मराठी च्या बॅनरखाली बनविण्यात आले आहे.
या गाण्याचे खास आकर्षक म्हणजे हे गाणे बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान ने हे गाणे गायले आहे.
विक्रम फडणीस (Vikram Phadnis)दिग्दर्शित 'Smile Please' हा चित्रपट येत्या 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले या चित्रपटाचे अँथमही खूप लोकप्रिय झाले असून या गाण्यात महेश मांजरेकर, उर्मिला मातोंडकर, सई लोकुर, सोनाली खरे, प्रिया बापट, तेजस्विनी प्रधान, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, चिन्मय मांडलेकरसह 32 कलाकारांचा समावेश आहे.
'स्माईल प्लिज' या आगामी चित्रपटात मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर व्यतिरिक्त प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर, सतीश आळेकर, वेदश्री महाजन हे देखील महत्वाच्या भूमिकेत दिसून येतील.