Siddharth Chandekar (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकार सध्या बोहल्यावर चढताना दिसत आहे. नुकतेच मानसी नाईकच्या लग्नाची बातमी ऐकतो न् ऐकतो तोच आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. तसे या दोघांचे गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या मित्रपरिवाराकडे केळवणाचे फोटो रंगत होते. त्याचे फोटोज देखील या दोघांनी सोशल मिडियावर शेअर केले होते. मात्र आता सिद्धार्थच्या घरी लग्नविधींना सुरुवात झाली असून त्याचे फोटोज त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

सिद्धार्थ चांदेकर याच्या घरी ग्रहमाखच्या (Grahamak) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थने लग्नविधींचा एक फोटो शेअर करुन त्याखाली मजेशीर कॅप्शन लिहिले आहे.हेदेखील वाचा- Siddharth-Mitali Kelvan Photos: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांचंं पहिलं केळवण ईशा केसकरच्या घरी; पहा फोटोज

'सोड मुंज झाली. आता जातो काशी ला. ओके बाय' असं मजेशीर कॅप्शन त्याने या पोस्टखाली दिले आहे.

Siddharth Chandekar (Photo Credits: Instagram)

मागील अनेक वर्षांपासून अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर एकमेकांना डेट करत आहेत. साखरपुड्यानंतर आता वर्षभराने ही जोडी विवाहबंधनात अडकत आहे.

या दोघांनी साखरपुड्यानंतर प्री वेडिंग फोटोशूट देखील केले होते. हे अंडरवॉटर फोटोशूट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.